क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलतर्फे सायकल रॅली

0

शहादा। येथील क्रीएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल शहादा व शहादा सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा – नेवाली -शहादा अशा 100 किमी बीआरएमचे आयोजन करण्यात आले होते. शहादे शहरात नियमितपणे सायकलिंग करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ढासळते आरोग्य सुधारण्यासाठी व वाहनांमुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी नियमितपणे सायकलिंगचा अवलंब करावा असा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला. या रॅलीचा शुभारंभ दीपक पुरुषोत्तम पाटील,पो.नि. बुधवंत, मुख्याधिकारी गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सकाळी 6 वाजता भाऊ तात्या पेट्रोल पंप येथून रॅलीस सुरूवात झाली. या रॅलीत शहादा,नंदुरबार व दोंडाईचा येथील सायकलपटूंनी सहभाग नोंदवला.

यांचा होता सहभाग
या रॅलीत डॉ.विवेक हरी पटेल ,डॉ.शिरीष शिंदे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. विशाल पाटील ,डॉ.मनोज पटेल ,डॉ.लकेश पाटील,डॉ.प्रदीप पाटील ,डॉ.अतुल पाटील ,डॉ.यतिष पटेल,डॉ.विवेक नगीन पाटील,डॉ.निकुंज ,डॉ.सुनील पाटील,महेश ठाकूर,नरेंद्र पाटील ,मुफद्द्ल यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे नामवंत महिला डॉक्टर्स ,डॉ.दीपा सचिन चौधरी ,डॉ.सोनाली अभिजित पाटील ,डॉ.मेघना विवेक पटेल ,डॉ .सीमा लकेश पाटील यांनी पुरुष स्पर्धकांच्या बरोबरीने नियोजित वेळेत स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धा यशस्वीतेबद्दल क्रीएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ.सचिन पुरुषोत्तम चौधरी व डॉ.विवेक हरी पटेल यांनी स्पर्धकांचे व मार्शल डॉ.दीपक मोरे यांचे अभिनंदन केले.