मुंबई। क्रिकेट मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा एका पाठोपाठ विक्रम सर करित आहे.त्यात अजून भर पडित त्याने जाहिरात क्षेत्रात नवा विक्रम केला आहे.त्याने जाहिरात क्षेत्रात महेंद्रसिंग धोनी, अभिनेता शाहरुख खान,आमिर खान यांना मागे टाकले आहे.कंपनीला एका दिवसाच्या जाहिरातीसाठी पाच कोटी रूपये मोजावे लागणार आहे.त्यामुळे एका दिवसात सर्वाधिक मानधन घेणार स्टार ठरला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने गेल्याच महिन्यात जर्मनीच्या ’प्यूमा’ या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी 8 वर्षांसाठी तब्बल 110 कोटींचा करार केला आहे. जाहिरात जगतातही विराट कोहली नवे विक्रम प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला आहे. देशविदेशातील कोणत्याही एका कंपनीला आपली जाहीरात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत करायची असेल तर कोहलीच्या एका दिवसाच्या शूटसाठी कंपनीला तब्बल पाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या वर्षापेक्षा मानधनात वाढ
गेल्या वर्षापर्यंत कोहली एका दिवसाच्या जाहिरात चित्रीकरणासाठी अडीच ते साडेतीन कोटी मानधन घेत होता. कोहली पेप्सिको कंपनीसोबतच्या जाहिरात कराराचे नुतनीकरणासाठी आपल्या मानधनात वाढ करून घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पेप्सिको कंपनीच्या कोकाकोला या उत्पादनावर आरोग्यासाठीची शंका उपस्थित केली जात असल्याने या कंपनीसोबत करार करावा की नाही या संभ्रमात कोहली आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत कोहलीचा पेप्सिकोसोबत करार आहे. त्यानंतरही करार कायम राखण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
8 वर्षांसाठी तब्बल 110 कोटींचा करार
गेल्याच महिन्यात कोहलीने जर्मनीच्या ‘प्यूमा’ या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी 8 वर्षांसाठी तब्बल 110 कोटींचा करार केला आहे. कोहलीने जाहिरात विश्वात एका दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, रणवीर आणि रणबीर कपूर यांना मागे टाकले आहे. गेल्याच वर्षी पेप्सिको कंपनीने गेल्या 11 वर्षांपासूनचा धोनीसोबतचा करार संपुष्टात आणला होता.प्यूमासोबतच कोहलीचा ऑडी कार, एमआरएफ टायर्स, टिस्कॉट वॉचेस, जिओनी मोबाईल, बूस्ट, कोलगेट टूथपेस्ट आणि विक्स या अग्रगण्य ब्रॅण्ड्ससोबत करार केला आहे.