दौंड । बांगलादेशात खेळल्या जात असलेल्या बांगलादेश प्रिमीयर लिग स्पर्धेतील ढाका विरुद्ध रंगपूर या सामन्यावर दौंडमध्ये सट्टा घेणार्या दोघांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. शदीद रफीक शेख व तिरेश केशवदास काकरा अशी त्यांची नावे आहेत.
ढाका विरुद्ध रंगपूर या सामन्यावर दौंडमध्ये सुरभी अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये सट्टा सुरू असल्याची माहीती शनिवारी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकणी छापा टाकत सट्टा घेणार्या दोघांना ताब्यात घेतले. तर रफीक शेख, जितेंद्र दुलाणी, रियाज बागवान, नरेंद्र फरार झाले आहेत. अटक केलेल्या दोघांकडून 9 मोबाईल संच व अडीच हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुण्याचा गुड्डू व नाशिकचा आकाश या बुकिंसाठी ते सट्टा घेत असल्याचे तपासात पुढे येत आहे. नऊ मोबाईल व त्यावर येणारे ग्राहकांच्या असंख्य कॉलमुळे प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार आहे.