मुंबई : ‘क्रिकेट हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं नाही’, कारण क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझं आयुष्य नाही. 8 वर्षानंतर माझं कुटुंब माझ्यासाठी महत्वाचं असल्याचं विराट कोहलीने म्हंटले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोणतीच सीरीज हरली नाही. टी 2- आंतरराष्ट्रीय सामन्यात 1-1 अशी बरोबर केली तर टेस्ट सिरीजमध्ये 2-1 ने विजय पटकावला. तसेच वन-डे सिरीजमध्ये विराट ब्रिगेडने 2-1 ने सामना आपल्या नावे केला. अशा पद्धतीने भारतीय संघाचा संपूर्ण प्रदर्शन हे चांगल होतं. असं सगळं असताना विराट कोहलीने अतिशय धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे.
कोहलीने आपल्या पुढील 8 वर्षांचे प्लान शेअर केले आहेत. यावेळी कोहली म्हणाला की, ‘एकदा निवृत्त झाल्यावर बॅट हातात घेणार नाही. क्रिकेट ही माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे पण क्रिकेटच माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे असं नाही.’ ‘माझ्यासाठी पत्नी अनुष्का आणि माझं कुटुंब हे सर्वात महत्वाचं आहे, असं विराट म्हणाला. निवृत्तीनंतर सर्वाधिक वेळही कुटुंबासोबत घालवणार आहे. कारण क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझं आयुष्य नाही. 8 वर्षानंतर माझं कुटुंब माझ्यासाठी महत्वाचं’, असल्याचं विराटने म्हंटले आहे.
विराट कोहलीने आपल्या ऍपद्वारे एक व्हिडिओ क्लिप रिलीज केली आहे. यामध्ये हा खुलासा केला आहे. एवढंच नव्हे, तर पुढे विराट म्हणतो की, मला माहित आहे माझ्या या वाक्याला चाहते खूप गांभीर्याने घेतील. पण मी क्रिकेटला आपलं आयुष्य मानतं नाही याचा अर्थ असा नाही की, मी त्यासाठी समर्पित नाही, असं होत नाही. असंही विराटने म्हंटले आहे.