क्रिकेट सामन्यामुळे धुळे शहरात शुकशुकाट

0

धुळे । भारत-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये होणारा क्रिकेट सामना म्हटला की किक्रेटप्रेमींमध्ये उत्साह असतो़ आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी धुळेकरांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह होता. या लढतीमुळे रविवारी दुपारनंतर धुळे शहरात शुकशुकाट होता. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत व पाकिस्तान हे दोघे संघ एकमेकांसमोर उभे ठाकल़े शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शासकीय कर्मचा:यांसाठी रविवार सुटीच्या दिवशी सामना असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला़ दुकानदार, व्यावसायिकांनी सामन्यासाठी आपली दुकाने बंद ठेवली़ तर महत्वाच्या कामानिमित्तांने बाहेर पडलेल्यांनी दुकाने, हॉटेलवर सामना पाहण्यासाठी गर्दी केली़ अंतिम लढतीमुळे शहरातील रस्ते, मार्केटमध्ये शुकशुकाट होता़