केमिस्ट असोसिएशनतर्फे आयोजन
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर केमिस्ट असोसिएशनच्यावतीने थेरगाव येथील वेंगसरकर अॅकॅडमीच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये त्रिवेणीनगर केमिस्ट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले होते. त्रिवेणीनगर केमिस्ट संघ विजेता ठरला, तर निगडी केमिस्ट संघाने द्वितीय क्रमांक आणि होलसेल चिंचवड संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे समालोचन मधुकर बच्चे, संतोष कंद, सूरज चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्युत नियंत्रण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी केले. संतोष खिंवसरा यांनी आभार मानले.