क्रिमिनल ट्रॅकींग सिस्टममुळे गुन्ह्यांची तत्काळ उकल होण्यास मदत
विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील : भुसावळात तपासणी
भुसावळ : गुन्हेगारांची माहिती एका क्लिवर उपलब्ध होण्यासाठी नाशिक परीक्षेत्रात प्रथमच क्रिमिनल ट्रॅकींग सिस्टम सुरू केली जाणार आहे, हे आधुनिक सॉफ्टवेअर लवकरच पोलिस दलात दाखल होईल, यामुळे गुन्हेगारांचे प्रोफाईलच समोर येणार आहे, यामुळे गुन्ह्यांचा शोध लावणे सुकर होणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी येथे दिली. शहरातील डीवायएसपी कार्यालयात रविवारी सायंकाळी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी भेट देऊन वार्षिक निरीक्षण केले. यावेळी त्याच्या समवेत पोलिस अधीक्षक राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकात गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
बी.जी.शेखर पाटील यांनी भुसावळ विभागातील पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडील कामाचा आढावा घेतला. कोणते गुन्हे जास्त वाढले आहे, त्यावर काय उपाययोजना हव्यात याची माहिती घेतली. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघन, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक, सहा.निरीक्षक अनिल मोरे यांच्या सह प्रत्येक पोलिस ठाण्यातील दुय्यम अधिकारी उपस्थित होते.
पहिलेच आधूनिक सॉप्टवेअर
आयजी शेखर पाटील म्हणाले की, पोलिस दलातर्फे गुन्हेगारांसाठी क्रिमीनल ट्रॅकींग सिस्टम हे नवीन सॉफ्टवेअर विकसीत केले जात आहे. परीक्षेत्रात हे पहिलेच आधुनिक सॉफ्टवेअर असेल, यात गुन्हेगारांची माहिती, त्यांचे प्रोफाईल, त्याचे पत्ते, किती गुन्हे दाखल आहे, त्यांची मोंडस ऑपरेंडी मिळणार आहे, यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दोन गुन्हेगार दिले जाणार आहे, त्या गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन त्यांची माहिती अधिकार्यांना त्यांना द्यायची आहे, दर महिन्याला वेगवेगळे गुन्हेगार दिले जाणार आहे. गुन्ह्याचा तपास गुणवत्तापूर्वक व्हावा यासाठी तपासासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. हे प्रत्येक विभागाीय स्तरावर होणार आहे. मोट सायकल चोरीसाठी विशेष नियोजन केल्याचे ते म्हणाले.