क्रिस गेलचा आणखी एक नवीन विक्रम

0

लंडन । वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने पुन्हा एकदा नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० क्रिकेट सामन्यामध्ये गेलने नवा विक्रम केला आहे. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या एविन लुईससोबत इनिंगची सुरुवात करण्यासाठी गेल मैदानात उतरला. यावेळी गेलने २१ चेंडूमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत ४० धावा केल्या क्रिस गेलने या दरम्यान ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. मात्र, पहिला षटकार लगावताच गेलने आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे.

इंग्लंड विरोधात झालेल्या या सामन्यामध्ये पहिला षटकार मारताच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये गेलने आपल्या षटकारांची सेंच्युरी पूर्ण केली. हा सामना खेळण्यापूर्वी गेलच्या नावावर ९९ षटकारांची नोंद होती. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर होता. मात्र, षटकारांची सेंच्युरी करत आता अनोखाविक्रम ख्रिस गेलने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत खेळलेल्या ५२ टी-२० सामन्यांमध्ये ४९ डावांमध्ये १५३७ धावा केल्या या दरम्यान गेलने १३४ चौकार आणि १०३ षटकार लगावले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये गेलचा स्ट्राइक रेट जवळपास १५ आहे.