क्रीडा प्रबोधिनीचाही शंभर टक्के निकाल

0

पिंपरी : महापालिकेकडून शहरात विद्यार्थी दशेत खेळाला प्राधान्य देणार्‍या व यश मिळविणार्‍या मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी विद्यालय नेहरुनगर येथे चालविले जाते. महापालिकेने या विद्यालयाची सुरुवात सन 2000 साली केली होती. या क्रीडा प्रबोधिनी शाळेचा निकाल मागील पाच वर्षांपासून सातत्याने शंभर टक्के लागतो. याही वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महापालिका शाळा आणि त्यातही खेळात रस असलेले हे विद्यार्थी अभ्यासात कमी पडत नसल्याचे यातून दिसून येते.