जळगाव । शहरात उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडा संकुलास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. ही प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची बाब आहे. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ क्रीडा संकुलाचे नाव कोरण्यात आले आहे. मात्र या नावातील ‘वा’ हे अक्षर गेल्या काही दिवसांपासून नष्ट झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसतो आहे.
नावातील अक्षराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देवून क्रीडा संकुलाच्या नावात नव्याने सुधारणा करावी व हे काम युद्धपातळीवरून हाती घेऊन छत्रपतींच्या नावाचा यथोचित आदर राखावा. याबाबतची त्वरीत कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव मनसे स्टाईल आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर उद्भवणार्या परिस्थितीला क्रीडा संकुल प्रशासन संपूर्णपणे जबाबदार राहिल. 4 दिवसाची मुदत देण्यात आली असून त्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते मनसे स्टाईल आंदोलन करतील असे विनोद शिंदे, अजित शिंदे, संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, संदीप मांडोळे, मितेश भदाणे आदींनी कळविले आहे.