क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते पी.व्ही.सिंधूचा सन्मान !

0

नवी दिल्ली: जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे आज मायदेशात आगमन झाले आहे. आज सकाळीच पी.व्ही.सिंधू देशात परत आली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते पी.व्ही.सिंधूचा सन्मान करण्यात आला आहे. “इतिहास रचणार्‍या पीव्ही सिंधूचा सन्मानकरताना मला अभिमान वाटतो आहे असे क्रीडामंत्री यांनी म्हटले आहे. यावेळी पी.व्ही.सिंधू सोबत तिचे प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद, वडील व्यंकट सिंधू उपस्थित होते.