तर्हाडी। क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी बाबतचे 28 एप्रिलच्या परिपत्रकाप्रमाणे जारी केलेल्या शारिरीक शिक्षण विषयाच्या तासिका निम्म्याने कमी केल्याने शारिरीक शिक्षण शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. व शिक्षकांना शारिरीक शिक्षण विषय सोडून इतर विषय शिकवावे लागणार यांचा क्रीडा क्षेत्राला परिणाम होऊन क्रीडा शिक्षक पद काळाच्या पडद्याआड जाणार आहे.
त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील शारिरीक शिक्षण-शिक्षक संघटनेच्यावतीने शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी शिरपूर नितीन गावंडे व नायब तहसिलदार जी.बी. सुर्यवंशी यांना बहिष्काराबाबत निवेदन संघटनेचे अध्यक्ष के.डी. चौधरी, सचिव-प्राचार्य- व्ही. एस. मराठे, मनोज पाटील, आर.एस. चव्हाण, राधेशाम पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ए.डी. महाजन, आर. यु. चौधरी, के.पी.पाटील आदी उपस्थित होते.