क्रीडा संकुलाचे बांधकाम

0

शहादा । शहरातील गांधी नगरला लागून असलेले क्रिडा संकुलाचे उद्घाटन झाल्यानंतर ते बंद स्वरुपात आहे. शहरातील क्रिडाप्रेमी क्रिडासंकुल केव्हा सुरु होईल याची प्रतिक्षा करीत आहेत.अत्यंत घाईगर्दीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला क्रीडा संकुलाचे बांधकाम पुर्ण होवुन दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. क्रिडा संकुलाचे बांधकाम शहादा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनाच्या क्रिडासंचनालयाच्या निधीतून करण्यात आले पण ठेकेदाला बिल देण्यात विलंब झाला होता.परिणामी ठेकेदाराने क्रिडा संकुल बांधकाम विभागाकडे वर्ग केले नव्हते. शेवटी ठेकेदाराला दिर्घ प्रतिक्षेनंतर बिल अदा करण्यात आले. त्यात राजकारणाच्या शिरकावामुळे उद्घाटन लांबले होते. आता गेल्या पंधरा दिवसापासून क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले.त्याला कुलुप असते. त्याचा उपयोग काय? कोणत्याही प्रकारचे इनडोर खेळ नाहीत.

अद्ययावत क्रीडा साहित्य, सुविधा नाहीत उपलब्ध
शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला. क्रिडाप्रेमीच्या उत्साह कमी करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जर पुर्ण अद्यावत क्रिडेचे साहित्य अथवा सुविधा उपलब्ध नव्हत्या तर उद्घाटन का केले ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात कुठेही मोठे मैदान शिल्लक नाही. प्रेस मारुती मैदान होते त्याठिकाणी ट्रक टर्मिनलसाठी आरक्षण आहे. शिवाय अतिक्रमण धारकानी ताबा घेतला आहे. ऱोज शहरातील तरूण मंडळी क्रिडासंकुलाच्या ठिकाणी येतात मात्र कुलुप लावलेले बघुन परत जातात. याबाबतीत आमदार उदेसिंग पाडवी यांनी दखल घेऊन जिल्हा क्रिडा अधिकारी यांना सुचना देउन क्रीडा संकुल सुरु करावे.त्याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. कोणाच्या काळात क्रिडा संकुल झाले त्यापेक्षा आ. पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा करुन क्रिडा संकुल पूर्ण करुन त्याचे उद्घाटन केले हे श्रेय त्यांचे आहे म्हणून त्यांनी दखल घेणे जरुरीचे आहे. अशी नागरिकांची अपेक्षा आहे.