Thieves stole a bike from Kothali Shiwar मुक्ताईनगर : कोथळी शिवारातील क्रीडा संकुल परीसरातून 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी 20 रोजी सायंकाळी चोरीला गेली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार विजय तळेले (हतनूर धरण, ता.भुसावळ) यांनी दुचाकी (एम.एच.19 डीएक्स.6830) ही सालबर्डी रोडवरील कोथळी शिवारातील क्रीडा संकुलानजीक उभी केली असता मंगळवारी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान चोरट्यांनी ती लांबवली. तपास नाईक विजय पठार करीत आहेत.