जळगाव । बांधकाविषयी शासनाची नवीन निमयावली आली असून त्याबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या एकत्र करून शासन दरबारी मांडणार असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्लपर असोसिएशनचे(के्रडाई) राज्य उपाध्यक्ष राजीव पारीख यांनी सांगितले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष अनिश शहा, सचिव सागर ताडे आदी उपस्थित होते.
शासनाच्या वतीने बांधकाम व्याससायिकांसाठी बांधकाम विकास नियमावली आणली असून त्याची माहिती व बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजीव पारेख हे राज्यभरात भेट देत आहे. विशेष म्हणजे पूर्वी बांधकामाची प्रत्येक शहराची वेगवेगळी नियमावली होती. मात्र, आता ही नवीन नियमावली 14 ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी लागू केली असून त्यात जळगावचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व 14 शहरांसाठीएकसारखी नियमावली राहणार आहे. असे असले तरी प्रत्येक शहराच्या समस्या वेगवेगळ्या आहे. त्यामुळे पारीख हे प्रत्येक शहरात जाऊन समस्या जाणून घेत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात याबाबत बांधकाम व्यावसायिकांचा अभ्यासवर्ग झाला. त्यात परीख यांनी नवीन नियमावलीबाबत मार्गदर्शन केले व समस्य जाणून घेतल्या. यावेळी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी समस्या मांडल्या. त्यात लहान प्लॉटधारकांच्या अधिक समस्या होत्या. जळगावसह राज्यातील सर्व समस्या एकत्र करून शासन दरबारी मांडण्यात येतील व नियमावलीत सुधारणा सुचविण्यात येतील, असे पारीख यांनी यावेळी सांगितले.