चिंचवड : रिवार्ड पॉईंटस् रिडीम वाढवण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारून एकाला 33 हजाराला गंडवले. ही घटना पिंपळे गुरवच्या स्प्रिंग्ज सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी प्रसाद जाधव (वय 35, रा. पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रसाद यांना अज्ञात मोबाईलधारकाने फोन केला. तुमच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट्स रिडीम करावयाचे आहे, असे सांगून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर प्रसाद यांच्या एसबीआय आणि ओरिएन्टल बँकेतील ऑनलाईन माध्यमाव्दारे एकूण 33 हजार 129 रुपये परस्पर काढून फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.