मुंबई: भारत हे जगातील सर्वात जलदगतीने विकसित होत असलेल्या वैद्यकीय पर्यटन स्थळांपैकी एक असून जगभरातील रुग्णांना आकर्षून घेण्याकरिता वैद्यकीय तंत्रज्ञान व सेवा सुधारण्यावर सतत कार्य करत आहे.
याच प्रयत्नांमध्ये, क्रेडिहेल्थ, या भारताच्या वैद्यकीय सहाय्य देणा-या आघाडीच्या कंपनीने त्यांच्या वैद्यकीय पर्यटन पोर्टलच्या दाखलीकरणाची घोषणा केली आहे. एकसंधी व विशेष वैद्यकीय सेवा- सुविधांसह परदेशी रुग्णांच्या मागण्यांची पूर्तता करणे, हा या दाखलीकरणाचा मूळ हेतू आहे. कंपनी आपल्या विशेष सहाय्यतेसह असंघटित विभागामधील पोकळी भरुन काढण्याचा आणि परदेशी रुग्णांची फसवणूक होण्याला प्रतिबंध करण्याचा हेतू राखते. नवीन उपक्रम खर्चामधील पारदर्शकता, देशी भाषेमध्ये सहाय्यता आणि परदेशी रुग्णांना सामना कराव्या लागणा-या इतर आव्हानांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.