जळगाव । क्रेडीट कार्डचा नंबर विचारून नेहरू नगरातल्या शिक्षकाला चोरट्यांनी ऑनलाईन शॉपींग करून सात हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिक्षकाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर बँकेतून बोलत असल्याचे भासवत तुमच्या क्रेडीट कार्डचे भरपूर पॉईंट्स जमा झाले असून ते पैशात रुपांतरीत करायच आहे का? असे विचारून क्रेडीट कार्डचा नंबर जाणून घेत चोरट्यांने हा ऑनलाईन गंडा घातला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली तक्रार
नेहरू नगरातील सागरपुष्प अपार्टमेंन्टमध्ये दिपक रामभाऊ शिंपी हे कुटूंबासोबत राहतात. तर ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, बुधवारी दिपक हे घरी असतांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांना 9810311875 या मोबाईल क्रमांकावरून मोबाईल कॉल आला आणि बँकेतून बोलत असून तुमच्या के्रडीट कार्डचे भरपुर पॉईंट जमा झाले आहेत ते पैश्यात रुपांतरीत करण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडीत कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. दिपक शिंपी यांनी विश्वास ठेवून त्यांना के्रडीट कार्डचा नंबर सांगितला. परंतू क्रमांक सांगितल्यानंतर काही वेळातच त्यांना 7 हजार रुपयांची ऑनलाईन शॉपींग केल्याचा मेसेज मोबाईलवर आला. यानंतर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी बँकेत जावून लागलीच आपले क्रेडीत कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात सात हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक झाल्याची त्यांनी तक्रार दिली.