क्रेनची रोपवायर तुटून विहिरीत पडल्याने दोघे जखमी

0

जळगाव : क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असतांना क्रेनची रोपवायर परड्यातून विहिरीच्या बाहेर येत असतांना 30 फुटावरून रोपवायर तुटल्याने दोघेजण परड्यासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास भागदर ता. जामनेर येथे घटली. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. योगेश गणपत जोगी (वय-30) आणि लक्ष्मण यशवंत जोगी (वय-35) रा. भागदरा ता.जामनेर असे जखमी झालेल्यांची नावे आहे.

जिल्हा सामान्र रूग्णालरात उपचारार्थ दाखल
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गणपत जोगी, लक्ष्मण यशवंत जोगी, रमेश पंडील जोगी आणि संजू हिरामण जोगी यांनी मोयगाव भागदरा रस्त्यावर बाबू राजपूर यांच्या विहिरील गाळ काढण्यासाठी काम घेतले होते. या विहिरीतून गाळ काढण्यासाठी सहा जण गेल्या आठवड्यापासून काम सुरू केले. चौघेजण विहिरीत क्रेनच्या वायररोप परड्याच्या सहाय्याने विहिरीत उतरले. त्यांनतर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास योगेश गणपत जोगी, लक्ष्मण यशवंत जोगी विहिरीत काम आटोपल्यानंतर वायररोपच्या परड्यात उभे राहून विहिरीच्या बाहेर येत असतांना वर 30 फुटापर्यंत आल्यानंतर अचानकपणे वायररोप तुटल्याने दोघे थेट खाली आले. दोघांच्या छातील गंभीर दुखापत होवून जखमी झाले. विशेष म्हणजे विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने दोघांच्या डोक्याला कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही. विहिरीच्या बाहेर उभे असलेले दोघांनी चौघांना बाहेर काढल्यानंतर जखमीअवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.