क्रेन धडकेत वृद्धा ठार

0

भोसरी : येथील एमआयडीसीमध्ये कचरा गोळा करणार्‍या 90 वर्षीय वृद्ध महिलेचा क्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.22) सकाळी साडेनऊ वाजता घडली. रुक्मिणी लक्ष्मण साळवे (वय 90, रा महात्माफुलेनगर, भोसरी) असे मयत महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा रामहरी साळवे (वय 66) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघाताची कोणतीच माहिती न देता क्रेन चालक तेथून पळून गेला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात क्रेन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.