क्रेन पलटी झाल्याने मजूरात दुर्दैवी मृत्यू

0

लोहारा-म्हसास शिवारातील घटना
लोहारा – येथून जवळच असलेल्या म्हसास ता पाचोरा या शिवारात प्रकाश भगीरथ राठोड रा रामेश्वर तांडा यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरु असतांना क्रेन मशिनवर काम करणाऱ्या मजुराचा क्रेन अचानक पलटी झाल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत लोहारा येथील संतोष उत्तम चौधरी (वय-३५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून विहिरीचे काम सुरू होते व यावेळी अन्य ३मजूरही विहिरीत होते. मात्र दुर्दैवाने संतोष याचा मृत्यू झाला. संतोष याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. तंटा मुक्त समीतेचे अध्यक्ष अमृत चौधरी यांच्या खबरीवरुन पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. या घटनेने लोहाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.