क्लिंटन यांच्या घरी आढळला बॉम्ब!

0

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या घरात बॉम्ब आढळण्याची घटना घडली आहे. नेहमीच्या तपासाच्या आलेल्या तंत्रज्ञाला घरात विस्फोटक पदार्थ आढळून आले.

क्लिंटन यांच्या घरात आढळून आलेले विस्फोटक पदार्थ माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यालयातही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
विस्फोटक पदार्थ असलेले पॅकेट हिलरी क्विंटन तसेच ओबामा यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारचे पाकिट दोन दिवसांपूर्वी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या घरीही आढळले होते. गुप्तचर विभाग हे पार्सल कोणी पाठवले याचा शोध घेत आहे.