उदयपूर : – धावत्या बसमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर क्लीनरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर तालुक्यात हि घटना घडली.
पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत लग्नासाठी चालली होती. मुलीच्या आजोबांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चिंचोड गावात रात्री ९.३० च्या सुमारास बस पकडली. कुटुंबिय पुढच्या सीटवर बसले होते. तर मुलगी मागच्या बाजूला असलेल्या स्लीपर केबिनमध्ये जाऊन बसली होती. स्लीपर केबिनमधून कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा आवाज मुलीच्या काकांच्या कानावर ऐकू पडला व त्यांनी दरवाजा उघडला असता मुलीसोबत बसचा क्लीनर विष्णू कोळी तिथे होता. या प्रकारामुळे बसमध्ये एकच गोंधळ व आरडाओरडा सुरु झाल्याने बस चालकाने गाडीचा वेग कमी केला. विष्णू कोळी हा रात्रीचा अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाला.