मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत लवकरच ‘पंगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून कंगना यात महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. कंगना या चित्रपटात ती राष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपट्टूची भूमिका साकारणार आहे. या आव्हानात्मक भूमिकेसाठी कंगनाला तब्बल १० किलो वजन वाढवावे लागणार आहे.
अश्विनी अय्यर तिवारीने ‘पंगा’च्या शूटिंगला रविवार (११ नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली असून इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करुन याबद्दलची माहिती दिली.