नंदुरबार: येथील क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास पंचामृताने अभिषेक व मार्ल्यापणाने अभिवादन करण्यात आले.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टनचे पालन करुन मोजक्या कार्यकर्त्यांना घेवून क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे राज्याभिषेक सोहळा पार पडला. मराठा क्षत्रिय युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांच्या हस्ते जुन्या नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास मंचामृताने अभिषेक व मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती महाराजांच्या नावाच्या गर्जनेने जयघोष करीत राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी तेजस मराठे, दिपक मराठे, यश लुळे, विक्की जाधव, कल्पेश बडगुजर, सचिन मराठे, कुणाल मराठे, आदित्या चौधरी, निखिल बोरसे, जयेश शिंदे, यशवराज मराठे, पंकज मराठे, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.