क्षत्रिय मराठा समाज सामुहिक विवाहसोहळा

0

जळगाव : क्षत्रिय मराठा समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात समाजातील पाच जोडपी विवाहबद्ध झाले. शहरातील शिवाजी नगरातील पटेलवाडी येथे क्षत्रिय मराठा समाजाचा बारावा सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. सामूहिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी महापौर रमेश जैन, नितीन लढ्ढा, गफ्फार मलिक, अशोक शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी जोडप्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आर्शिर्वाद दिला. तसेच 5 रोजी सामाजातील युवक युवतींचा परिचय मेळावा घेण्यात आला.

72 युवक-युवतींनी दिला परीचय
यात सुमारे 72 युवक-युवतींनी आपला परिचय करुन दिला होता. दरम्यान याप्रसंगी प्रा. डी.डी. बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर समाजातर्फे हळदीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी प्रशांत बच्छाव, गणपत पोळ, केशव पोळ, नगरसेविका गायत्री शिंदे, मुकुंद चौधरी, शिवाजी शिंदे उपस्थित होते. सामुहिक विवाह सोहळ्याला सातारा, गोंदिया, ग्वालियर, खंडवा, नांदूरा, अमळनेर, चाळीसगाव यासह राज्यभरातून समाजबांधवांनी उपस्थिती दिली होती.