शिंदखेडा। अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या धुळे जिल्हा युवा अध्यक्ष पदी भुपेंद्रसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिंदखेडा तालुका युवा अध्यक्षपदी जयपाल राजपूत यांची निवड करण्यात आली. भुपेंद्रसिंह राजपूत यांच्या सामाजिक कार्यची दखल घेऊन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा.पंकज सिंह,महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ महामंत्री राजेंद्रसिंह राजपूत यांनी धुळे जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड केली आहे.
यांची होती उपस्थिती
नियुक्ति पत्र देतांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा.पंकज सिंह,महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ महामंत्री राजेंद्रसिंह राजपूत,राष्ट्रीय उपाध्यक्ष चंदनसिंह रोटेले, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पिंटूदादा राजपूत, प्रदेश युवा प्रकोष्ठ संघटक सतिषसिंह परदेशी , जितु राजपूत आदी उपस्थित होते. भुपेंद्रसिंह राजपूत यांना निवड झाल्या बद्दल मंत्री जयकुमार रावल,सुर्यभानसिंह राजपूत,सरकारसाहेब रावल,नेहा राजपूत,भिमसिंग राजपूत,अमरदिप गिरासे यांनी अभिनंदन केले.