क्षमता व आवडीने आपापल्या क्षेत्रात गाठा प्रगतीचे शिखर

0

माजी आमदार अरूण पाटील यांचे प्रतिपादन : राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे 300 गुणवंतांचा गौरव

भुसावळ – आई-वडिलांनी शिक्षणासोबत आपल्या मुलांना सुसंस्कारीत होण्याकडे लक्ष केंद्रित करावे आणि जिद्द व आत्मविश्‍वासातून ध्येय गाठण्यासाठी त्यांना नेहमी प्रेरणा देत राहावी तर विद्यार्थ्यांनी आपली क्षमता व आवड लक्षात घेवून करीयर निवडावे आणि आपापल्या क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठावे, असे प्रतिपादन रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांनी येथे केले. भुसावळातील राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही लोणारी हॉलमध्ये गुणवतांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक राहूल बोरसे, उद्योजक रतिराम पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के. पाटील, व्यवस्थापक राजेश पवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील, ललित मराठे, मराठा समाज अध्यक्ष रवी लेकुरवाळे, कुर्‍हे सरपंच अण्णा शिंदे, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगितला. माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी गुणवतांचा गौरव झाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी पोलिस क्षेत्रातील यशोगाथा सांगितली. उद्योजक श्रीराम पाटील यांनी फक्त नोकरीच्या मागे न धावता लघू उद्योगातून आपल्या करियरला सुरूवात करावी असे सांगितले. जे.के. पाटील यांनी शिक्षणाला महत्व देण्याविषयी सांगितले. यानंतर प्रतिष्ठानतर्फे मराठा समाज भूषण पुरस्कार 2018 हा रावेर तालुक्यातील मोरगाव येथील रहिवाशी व मध्यप्रदेशासह गुजरातमधील डेक्कन गृप ऑफ कंपनीचे चेअरमन रतिराम सिताराम पाटील यांना उपस्थित मान्यवरांसह प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मानपत्राचे वाचन ज्ञानेश्‍वर घुले यांनी केले. रतिराम पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी शोधल्यास आयुष्याची वाटचाल सुकर होत असल्याचे सांगितले आणि पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. विभागीय अभियंता झाल्याबद्दल प्रकाश चौधरी, विमा क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्काराबद्दल महेंद्र पाटील, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर पहिली ते पदवी, पदव्युत्तर तसेच इतर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सुमारे 300 गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, कंपासपेटी व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी तर आभार संस्थापक सचिव महेंद्र पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.