पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – क्षुल्लक कारणावरुन तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.27) सायंकाळी सहाच्या सुमारास शाहुनगर येथील महापालिका उद्यानाजवळ घडली. मुकेश बजरंग साळुंके (वय 18, रा. चिंचवड) असे जखमीचे नाव आहे. त्याने ओमकार (पूर्ण नाव माहिती नाही) व त्याच्या तीन मित्रांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आणि मुकेश हे दोघे मित्र आहे. मुकेशने ओमकारला फोन करुन तुझ्या मैत्रीणीचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे सांगितले. याचा राग मनात धरून ओमकार याने मुकेशला भेटावयास बोलावले व इतर मित्रांच्या मदतीने लाकडी दांडके, लोखंडी रॉड व लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये मुकेशच्या डोक्याला व छातीला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.