घणसोली: येथील एका शिधा वाटप दुकानाचा काळ्या बाजारात शासकीय धान्य विकण्याचा प्रश्न गाजत असतानाच दुसर्या एका दुकानात गेलेल्या महिलेला चक्क त्या दुकानदाराने क्षुल्लक कारणा वरून दमदाटी केली असल्याची तक्रार रबाले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आली.
या दुकानातून नेहमीच काळ्या बाजारात धान्य विकले जाते. दुकानावर कारवाई व्हावी म्हणून भाजप नवी मुंबई जिल्हा युवा मोर्चाचे सचिव भागवत खेडकर यांनी अन्न पुरवठा मंत्री व शिधा वाटप अधिकारी यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे.