कल्याण : कल्याण पूर्वेत क्षुल्लक वादातून पाच ते सहा अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा घटना घडली. कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात राहणारा विजय नगर परिसरातील एका शाळेत शिकणार्या 15 वर्षीय मुलाचे काही मुलांसोबत क्षुल्लक कारणांवरून वाद झाले होते.
हा राग मनात धरून त्या सहा मुलांनी या विद्यार्थ्याला शाळा सुटण्याच्या वेळेस गाठले. त्यांनी या विद्यार्थ्याला गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत मारहाण केली. मात्र हा विद्यार्थी त्याच्या तावडीतून निसटला. या प्रकरणी विद्यार्थ्यांने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व आरोपी हे अल्पवयीन असून दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्या वादातून हे प्रकरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले .