माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे : भुसावळात अ.भा.लेवा पाटीदार महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार
भुसावळ- स्पर्धेचे युग असून या युगात कुठलेही क्षेत्र लहान नाही मात्र त्यासाठी योग्यवेळी ध्येय ठरवणे गरजेचे आहे. स्पर्धेत जो मेहनत करेल तोच जीवनात निश्चितच पुढे जाईल, असे मौलिक विचार माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. शहरातील संतोषी माता सभागृहात अ.भा.लेवा पाटीदार महासंघातर्फे आयोजित गुणवंतांचा गौरवसोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
उमविला बहिणाईंचे नाव लेवा समाजाचा सर्वप्रथम ठराव
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यासंदर्भात सर्व स्तरावरून मागणी केली जात असलीतरी सर्वप्रथम लेवा समाजानेच त्या संदर्भात ठराव केला, असे माजी मंत्री खडसे म्हणाले. ते म्हणाले की, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांचे कौतुक करण्याचा हा उपक्रम आहे. आत्मविश्वास व न्यूनगंडामुळे यश मिळवता येत नाही. आता शिक्षणाची दालने खुली झाली असून जीवनाची दिशा देणारे दालन आपल्याला निवडायचे आहे. नोकरीच पाहिजे हे आपले ध्येय असू नये व्यवसायाच्या माध्यमातूनही विकास साधता येतो, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. लेवा समाजाने शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळवले असून त्या सोबतच संस्काराची जाणीव ठेवणेही गरजेचे असल्याचे त्यांनी एका उदाहरणादाखल सांगितले. समाजात राहताना सारेच समान आहोत, ही भावना असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणे ही सामाजिक जबाबदारी
गुणगौरव समारंभाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते व चांगल्या कामांसाठी प्रवृत्त करणे ही सामाजिक जवाबदारी असल्याचे विचार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, गेल्या 21 वर्षांपासून गुणगौरव सोहळा होत असल्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. लेवा समाजाच्या अनेक संस्था असून त्यातील लेवा युवा संघाचे कार्य गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातही चांगले यश मिळू शकते. विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत शिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनही यश मिळवता येईल. मसाका चेअरमन शरद महाजन म्हणाले की, लेवा समाजाचे नाव सातासमुद्रापार पोहोचले पाहिजे. राजकीय क्षेत्रात भक्कम व्यक्तिमत्वाला समाजाने साथ द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आजचे यश हे अखेरचे यश नाही तर ही यशाची सुरुवात आहे. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कौशल्य असणे गरजेचे आहे. नाहीच काही जमले तर नाथाभाऊंसारखे राजकारणात या, असा सल्लाही त्यांनी दिला. या ्रसंगी मेघना बर्हाटे, भावेश टोंगळे व श्रेया भंगाळे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
आमदार हरीभाऊ जावळे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, भुसावळ पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, नाहाटा महाविद्यालयाचे चेअरमन महेश फालक, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, किशोर पाटील, वसंत पाटील, बापू महाजन, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश पिंटू राणे, लेवा महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, वासुदेव इंगळे, परेश फालक, प्रदीप भोळे, पुरूषोत्तम नारखेडे, मुरलीधर (गोलू) पाटील, शैलजा नारखेडे, प्रीतमा महाजन आदींची उपस्थिती होती.
यांनी घेतले परीश्रम
सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार देवा वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देवा वाणी, श्याम भारंबे, रूपेश चौधरी, कोमल चौधरी, गिरीश चौधरी, राहुल नेमाडे, नीलेश राणे, संकल्प वाणी, प्रवीण पाटील, विनय चौधरी, मनोज टोंगळे, भालचंद्र चौधरी, ओम वाणी आदींनी परीश्रम घेतले.