क्षेपणास्त्र डागल्याच्या मेसेजमुळे थरकाप

0

वॉशिंग्टन : क्षेपणास्त्र डागल्याचा मॅसेज चुकून पाठविला गेल्याने अमेरिकेतील नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. अमेरिकेतील प्रमुख राज्य असणार्‍या हवाईत क्षेपणास्त्र डागल्याचा मेसेज मोबाईलवर चुकून पाठवण्यात आल्याने क्षणार्धात सर्वत्र भीतेचे सावट पसरले होते. सकाळी 8 च्या सुमारास आपत्कालीन मेसेज आला. अमेरिकेतील हवाई भागाच्या दिशेने बॅलिस्टिक मिसाईल येण्याची भीती आहे. तातडीने योग्य ठिकाणी आश्रय घ्या. ही कोणतीही ड्रील नाही, अशी सूचना त्यात होती. त्यामुळे नागरिकांचा अधिक थरकाप उडाला.