खंडणीसाठी दोन मुलांची अपहरण करुन हत्या

0

औरंगाबाद । खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या दोन घटना अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू गावात राहणारा 16 वर्षीय अक्षय पानवकर शनिवारपासून गायब होता. शेजारच्या गावात यात्रा असल्याचे सांगून अक्षय गेला होता. मात्र तो परत आला नाही. तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. खंडणीखोरांकडून 20 लाख रूपयांची मागणी केली होती. अन्यथा त्याची हत्या केली जाईल. मात्र मंगळवारी दौंड तालुक्यातील पाटस परिसरात अक्षयचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी काष्टी गावातील दोन अल्पवयीन मुलांसह अमोल कोकरे, अजय मांढरे अशी चौघांना अटक करण्यात आली आहे.

अपहरणाची दुसरी घटना औरंगाबाद मधील म्हणजे गुरूकुंज हाऊसिंग सोसायटी, टिळकनगर भागातून साडे आठ वाजता वर्धन धोडे या 10 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते.त्यावेळी घरात पाच कोटीच्या खंडणीची मागणी करण्यारी चिठ्ठीही टाकली होती.मध्यरात्री 12 च्या सुमारास दोन्ही आरोपींनी वर्धनची गळा आणि तोंड दाबून निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून श्रेयनगर परिसरातील नाल्यात फेकला. आरोपी पळ काढत असताना त्यांची गाडी एका झाडाला अडकली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला.आरोपी अभिलाष महोनपूरकर आणि शाम मगरे यांना रात्रीच अटक करण्यात आली आहे.