खंडणी प्रकरणी एकास पोलीस कोठडी

0

भुसावळ । दीनदयाल नगरातील एका महिलेस 10 हजार रूपये खंडणीसाठी दोन सराईत गुन्हेगारांनी चाकूचा धाक दाखवला. महिलेने नकार दिल्याने संबंधितांनी हातावर चाकूने वार करून महिलेस जखमी केल्याप्रकरणी दोन्ही गुन्हेगारांविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सापळा रचून पोलिसांनी केली अटक
जामनेर रोडवरील दीनदयाल नगरमधील मशिदीजवळील रहिवासी दिपाली शर्मा यांना सुरेश उर्फ टकल्या पवार तस्लीम उर्फ काल्या यांनी गुरुवार 14 रोजी सायंकाळी खंडणीची मागणी केली. महिलेने त्यास नकार आरोपींनी महिलेच्या डाव्या हातावर वार केला. तसेच खंडणी दिल्यास महिलेच्या मुलांना शाळेतून उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे पोलिस हेडकॉन्स्टेबल निशिकांन जोशी, पोलीस नाइक संजय भदाने, दिनेश कापडणे यांच्या पथकाने अटक केली असून सुरेश उर्फ टकल्या याला अटक केली आहे. 18 रोजी पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.