खंडणी बहाद्दरांना चार दिवसाची पोलीस कस्टडी

0

फैजपूर – फैजपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ शैलेंद्र प्रभाकर खाचणे यांना 25 लाख रुपये रोख व प्रत्येकी महिन्याला एक लाख रुपये खंडणी मागणारे शांताराम मांगो तायडे रा. हिंगोणा, शेख युनूस शेख अय्युब उर्फ गबल्या व शाम पुनाजी इंगळे या तिघांविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशन ला गुन्हा 11 ऑगस्ट राजी दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून हे तिघही आरोपी फरार होते. आज यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची कस्टडी देण्यात आली आहे. डीवायएसपी राजेंद्र रायसिंग एपीआय दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जिजाबराव पाटील, हेमंत सांगळे, इकबाल शेख, उमेश चौधरी किरण चाटे, रमण सुरळकर, विकास कोल्हे या कर्मचाऱ्यांनी दि 6 साप्तेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पुणे येथील देहू रोडवरील भागात सापडा रचून त्यांना शांताराम मांगो तायडे रा हिंगोणा, व युनूस उर्फ गबल्या पकडण्यास यश मिळाले मात्र त्यातील तिसरा मोरक्या शाम पुनाजी इंगळे हा आरोपी फरार झाला असून याचा पोलीस कसून शोध घेत आहे. यासाठी पथक रवाना करण्यात आले असून त्याचे सुद्धा लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. सादर खंडणी आरोपींना ताब्यात घेऊन फैजपूर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली आहे. 7 साप्तेंबर रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.