खंडणी मागणार्‍या गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करावी

0

डॉक्टर व्यवसायीकांचे पोलीस प्रशासनाला निवेदन

फैजपूर- शहरातील आशीर्वाद अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ.शैलेश खाचणे यांना धमकी देत 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी गावातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देत गुंडांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

गुंडगिरी करणार्‍यांवर कारवाईची मागणी
डॉ.खाचणे यांना श्याम पुनाजी इंगळे, शांताराम मांगो तायडे शेख युनूस शेख सय्यद या तिघांनी विनाकारण हॉस्पिटलमध्ये येऊन 25 लाखांची खंडणी व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच त्यांच्या खाजगी जागेवर बोर्ड गाडून त्यावर हुकूमशाही गाजवत धमकी दिली आहे. शहरात गुंडगिरी करणार्‍यांना कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा अपप्रवृत्तींना आळा बसेल व भविष्यामध्ये, असे प्रकार पुन्हा होणार नाही, असे निवेदनात नमूद आहे.

निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षर्‍या
डॉ.मुद्दस्सर नजर, डॉ.भरत महाजन, डॉ.प्रशांत वायकोळे, डॉ.उमेश चौधरी, डॉ.नितीन महाजन, डॉ.सुनील पाटील, डॉ.श्रीकांत कुळकर्णी, डॉ.गणेश चौधरी, डॉ.रमाकांत भारंबे, डॉ.एम.के.झांबरे, डॉ.अशफाक अहेमद, डॉ.प्रेमचंद फिरके, डॉ.गिरीश लोखंडे, डॉ.तन्वीर शेख, डॉ.शोएब अली, डॉ.जी.एस.वर्मा, डॉ.पराग पाटील, डॉ.अभिजीत सरोदे, डॉ.अमित हिवराळे, डॉ.दानिश निसार व डॉ.अब्दुल जलील आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.