धुळे – शहराच्या गजबजलेल्या पाचकंदील चौकातील एका दुकानात घुसून दोघा महिलांसह चौघांनी व्यापार्याला अर्धनग्न करत त्याच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना रात्री घडली आहे. धुळ्यातील साक्रीरोडवरील कुमारनगरात राहणार्या महेंद्र निरंजनदेव रेलन (वय 61) या व्यापार्याचे धुळ्याच्या पाचकंदील येथील जयशंकर मार्केटमध्ये दुकान आहे. रात्री मनिषा रविंद्र माळी (रा.सोनगीर ता.धुळे), अनिता उर्फ जयश्री प्रकाश पवार, रोषण देविदास आणि दादू (सर्व रा.धुळे) हे दुकानात घुसले. शिवीगाळ करुन तुमचे अर्धनग्न काढलेले फोटो समाजात दाखवून तुमची बदनामी करु अशी धमकी देवून या आरोपींनी दोन लाखांची खंडणी मागितली. आरोपींविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पीएसआय आटोळे करीत आहेत.