खंडणी व दरोड्यातील वॉण्टेड आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- खंडणीसह दरोड्याच्या गुन्ह्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना वॉण्टेड असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख (रा.दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध 2 मार्च 2019 रोजी बाजारपेठ पोलिसात तक्रारदार मनीष रुपेश ठाकरे (रा.खळवाडी, भुसावळ) यास गावठी कट्टा दाखवून सात हजार रुपये बळजबरीने हिसकावून लुटल्याबाबत गुन्हा दाखल आहे तर 5 मार्च 209 रोज तक्रारदार दीपाली अमित शर्मा (रा.दीनदयाल नगर, भुसावळ) हिस देह व्यापार करून पैसे कमवून न दिल्याचे वाईट वाटून तक्रारदाराला धमकावून पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यात आरोपी सलीम हा वॉण्टेड होता मात्र तो मिळत नसल्याने त्याचा शोध सुरू असताना तो घोडेपीर बाबा दर्गा परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, सहा.फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, जयराम खोडपे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.