खंडपीठाच्या कारवाईच्या आदेशानंतर स्वतःहून काढले स्टॉल

0

धुळे । शहराचे आमदार अनिल गोटेंनी उभारलेली पांझरा चौपाटी प्रश्नी मंगळवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाला चौपाटीवरील कारवाई करून कार्यवृत्तांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल़े या आदेशानंतर पांझरा चौपाटीवरील स्टॉल व्यवसायीकाची स्वत:हून काढण्यास रात्री 11 वाजेच्या सुमारास सुरूवात केली. यावेळी लोकसंग्रामचे नेते तेजस गोटे, दिलीप साळूंखे, अमोल सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जनहित याचिकेद्वारा आक्षेप : पांझरा चौपाटीच्या जागेवर महानगरपालिकेचे बगिचाचे आरक्षण असूनही याठिकाणी बेकायदेशिर चौपाटी उभारून तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आक्षेप घेत ललित वारूडे यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले. यावेळी नायब तहसीलदार ज्योती देवरे यांनी न्यायालयात प्रशासनाची बाजू मांडतांना चौपाटीवरील स्टॉलधारकांना आधीच नोटिसा बजाविण्यात आले असल्याचे सांगितल़े. पांझरा चौपटीबाबत निर्णय आल्यानंतर स्टॉलधारकांनी रात्रीच आपले स्टॉल काढण्यास सुरूवात केली. पांझरा चौपटीवर महापालिकेचे बगिचेचे आरक्षण आहे. बगिचेचे आरक्षण असतांना यावर बेकायदेशीरपणे पांझरा चौपटी उभारून व्यावसायिक व्यापर सुरू झाल्याने ललित वारूडे यांनी जनहित याचीका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाने चौपाटीवरील कारवाईचे आदेश दिल्याने स्टॉलधारकांना स्वतःहून स्टॉल काढले.

पोलीसांचा बंदोबस्त
न्यायालयाने बुधवारी कारवाई करून गुरूवारी कारवाईचा कार्यवृत्तांत अहवाल छायाचित्रांसह सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री 11 वाजता पांझरा चौपाटीवर स्टॉल्स व्यवसाइकानी स्वत:हून हटविण्यास सुरूवात करण्यात आली़ जेसीबी, क्रेन, ट्रकच्या साह्याने चौपाटीवरील स्टॉल्स उचलण्यात आले. रात्री उशिरार्पंयत काम सुरू होते. सकाळी काही व्यावसायिकांनी स्टॉल हटविले. दरम्यान कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.