जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा न करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असला तरीही प्रातांधिकारी यांनी नंदगाव गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी लिलावाचे आयोजन केले आहे. प्रांताधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णया विरोधात खंडपीठात जाणार असल्याचे नंदगाव येथील सरपंच कविता सोनवणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. नंदगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात येऊन या सभेत नंदगाव गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा न करण्याचा ठराव मंजुर करण्यात आले. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या अधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात प्रांताधिकारी जात असल्याने या विरोधात औरंगाबाद यांचेकडे लवकरच दाद मागण्यात येणार आहे.