भुसावळ- मध्य रेल्वेच्या खंडवा रेल्वे स्थानकावर शनिवारी धडक तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आल्यानंतर 325 प्रवाशांकडून एक लाख 54 हजार 170 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (गुड्स) अरुण कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आलेल्या मोहिमेत 37 तिकीट निरीक्षकांसह सात रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांनी 325 प्रवाशांवर केसेस केल्या. विना तिकीट प्रवास करणार्या 163 प्रवाशांकडून 76 हजार 255 तर रीझर्व्ह डब्यातून आरक्षीत तिकीट नसताना प्रवास करणार्या 157 प्रवाशांकडून 77 हजार 55 रुपयांचा दंड तसेच सामानाचे बुकींग न करता प्रवास करणार्या पाच प्रवाशांकडून 860 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत एन.पी.पवार, बी.एस.महाजन, हेमंत सावकारे, प्रशांत ठाकूर, विवेन रॉड्रीक्स, एस.के.दुबे, आर.के.केसरी, मुन्ना कुमार, आर.के.गुप्ता आदींसह अन्य तिकीट निरीक्षक सहभागी झाले.