जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने जिल्हाधिकार्यांचा निकाल
भुसावळ– जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने खंडाळा ग्रामपंचायतीचे सदस्य सुकदेव अमृत पाटील यांना जिल्हाधिकार्यांनी सोमवार, 12 रोजी अपात्र ठरवले आहे. या संदर्भात भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक पंडित पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने संबंधित सदस्य अपात्र करण्यासंदर्भात 28 मार्च 2016 रोजी अर्ज दाखल केला होता.