खंडाळा बोगद्यात अपघात; 2 ठार

0

लोणावळा । लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या ताडदेव येथील युवकांच्या कारला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा बोगद्यात झालेल्या अपघातात युवक व युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघात अन्य तीन युवक जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खंडाळा भोर घाटातील खंडाळा बोगड्यामध्ये दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा बोगद्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून डिजायर कार (एमएच 01.एएक्स.6579) बोगद्याच्या भिंतीला धडकली. यात केविन कपाडिया (20) आणि पंक्ती पारेख (20, दोघे रा.मुंबई) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षिल शेठ (19), धैर्य शहा (19) आणि रजत गामी (18) हे जखमी झाले. यातील रजत गामी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तळेगाव येथील पायोनीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.