भुसावळ- तालुक्यातील खंडाळा येथील सरपंच वैशाली पाटील यांनी जात पडताळणी न केल्याने त्याना तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सरपंच पदावरुन अपात्र केले मात्र तीन महिने उलटूनही त्या सरपंचपदाचा पदभार सोडत नसल्याने शंकर नामदेव पाटील यांनी गत महिन्यात लोकशाही दिनी तक्रार केली होती तर गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी ग्रामसेवक विजय काकरवाल यांना पदभार काढण्याचे बजावले होते. ग्रामसेवक विजय काकरवाल यांनी 27 रोजी खंडाळा सरपंच वैशाली पाटील यांचा सरपंच पदाचा पदभार काढला आहे. सरपंचपदाच पदभार उपसरपंच सतीश चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.