भुसावळ- भारीप बहुजन महासंघाच्या शाखेचे तालुक्यातील खंडाळा येथे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ तालुकाध्यक्ष रुपेश साळुंके, युवा भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर, भुसावळ विधानसभा क्षेत्रप्रमुख अरुण तायडे, भुसावळ तालुका महासचिव प्रल्हाद घारु, तालुका संघटक बबन कांबळे, देवदत्त मकासरे, अरुण नरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे, तुषार जाधव, शरद सुरवाडे, विनोद सुरवाडे, प्रमोद गायकवाड व खंडाळा गावातील तरुणव ग्रामस्थ उपस्थित होते.