खंडित वीजपुरवठ्यामुळे कंडारीकरांना टंचाईचे चटके

0

गावातील पथदिवे बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल

भुसावळ– तालुक्यातील कंडारी ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात टंचाईचे चटके सोसावे लागत असून थकबाकीअभावी पाणीपुरवठा व पथदिव्यांची जोडणी कट करण्यात आल्याने ग्रामस्थांना अतोनात हाल सोसावे लागत आहेत. महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींकडे असलेल्या तब्बल 26 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा व पथदिवे वीजजोडणी थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. कंडारी ग्रामपंचायतीच्या पथदिवे व पथदिव्यांचा विजपुरवठा महावितरणने सोमवारी सायंकाळी खंडीत केला. यामुळे गावातील पथदिवे व पाणीपुरवठा यंत्रणा मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली आहे. महावितरणच्या भुसावळ विभागात ग्रामपंचायतींवर पाणीपुरवठा व पथदिवे जोडणीची तब्बल 26 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार नोटीस देवूनही थकीत रक्कमेचा भरणा होत नसल्याने महावितरणने ग्रामपंचायतींवर कारवाई केली. सोमवारी महावितरणने तब्बल 38 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कंडारी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला.