खंडीत श्रींच्या मुर्तींचे केले विधीवत पुन्हा विसर्जन

0

नंदुरबार । विसर्जन काळात खंडित झालेल्या गणपतींच्या मुर्त्या एकत्र गोळा करून यांचे सन्मानपूर्वक पुन्हा विसर्जन करण्याचा अभिनव उपक्रम नंदुरबार येथील जय दत्त व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. अनंत चथुर्दशीला गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेक जणांनी शिवण नदी,विरचक धरण, प्रकाशा तसेच लहान मोठ्या नद्यांमहध्ये लाडक्या गणरायाला निरोप देऊन विसर्जन केले मात्र नद्यांमध्ये पाणी कमी असल्याने गणेश मुर्त्या पूर्णपणे विसर्जित झाल्या नव्हत्या. हीबाब लक्षात घेऊन जय दत्त व्यायाम शाळेच्या पदाधिकारीच्या लक्षात आली. या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विविध ठिकाणी जाऊन विसर्जनाच्या वेळी खंडित झालेल्या गणपतींच्या मुर्त्या उचलून एकत्र केल्या. यामुर्त्या एका टक्ट्ररवर भरून त्यांचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले.

या तरूणांनी घेतला सहभाग
तरुणांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. दीपक दिघे,जितेंद्र पाटिल,राज्या गायकवाड़, महेश व्हराड,विशल मराठे,संजू गायकवाड़,प्रविण मराठे,राहुल मराठे,गजेन्द्र राजपूत,शभु राजपूत,अरुण जाधव,अल्पेश मराठे,चेतन जोशी,महेश जोशी,राज्या शिंपी,भूषण गायकवाड़, प्रशांत गायकवाड़, विशाल भोई, सोन्या जाधव, विजु राजपूत, विशाल राजपूत, अतुल पतंगपुरे, विजय माळी आदी कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.