खंडेराव महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आजपासून

0

शहादा। महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा 3 ते-6 जून दरम्यान होणार आहे. दोंडाईचा बायपासजवळ रोडवरील रामदेवबाबा नगरातील शेताजवळ सापडलेल्या खंडेराव महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्टेसाठी भव्य मंदिर उभारले आहे.

3 ते 6 जुन दरम्यान या मंदिरात श्री खंडेराव महाराजंच्या मूर्तीसोबतच शिवलिंग व पार्वती देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येणार आहे. 3 जून रोजी शहादा शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. 6 जून रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश रोहण करण्यात येउन महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास प. पु. महामंडलेश्वर श्री रामानंदपुरी महाराज (खेतीया) प .पु . ब्रम्हानिष्ट भावानंद स्वामी (शहादा) प. पु . शरद दादमुळे पुणे यांची प्रमुख उपस्थित लाभणार असल्याची माहिती खंडेराव महाराज भक्तानी दिली .