सावदा। येथील खंडेलवाल पिता पुत्रांविरुद्ध 2 कोटी 80 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी काही दिवसापूर्वी भुसावळ येथील सानिया कादरी यांनी सावदा पोलीस स्थानकासमोर उपोषण केले होते. 28 रोजी रात्री याबाबत सावदा पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
नायगाव येथील व्यापार्यानेही दिली होती तक्रार
या अगोदर या पिता पुत्राविरुद्ध नायगाव येथील केळी व्यापार्याच्या फिर्यादीवरुन देखील 8 लाखांची फसवणूक प्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सानिया कादरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा येथील कैलास खंडेलवाल, त्यांचे पुत्र मयूर खंडेलवाल, तसेच मुनीम अनिस उर्फ अन्नी (सर्व रा. सावदा) यांना कादरी यांनी 26 एप्रिल 2017 ते 18 जून 2017 या दरम्यान केळीचा माल खरेदीबाबत करारनामा करुन घेतला व ठरल्याप्रमाणे त्यांनी शेतकर्यांकडून केळी माल घेतला व खंडेलवाल पिता पुत्रांना विकत देऊन खंडेलवाल यांनी ती इतर व्यापार्यांना विकली.
खंडेलवाल पितापुत्र फरार
मात्र यात खंडेलवाल यांनी ठरलेल्या भावाप्रमाणे पैसे न देता कादरी यांच्या व्यापारात तोटा आला आहे. निम्मे भावाप्रमाणे पैसे घ्या, नाहीतर पैसे घेण्यास येऊ नका असे म्हणून केळी व्यवहाराचे ठरलेल्या भावाप्रमाणे पैसे न देता कादरी यांची फसवणूक करुन विश्वासघात केला म्हणून सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय राहुल वाघ करीत आहे. दरम्यान खंडेलवाल पिता – पुत्रांविरुद्ध हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अगोदरच ते फरार झाले असल्याने अद्याप पोलिसांचे हाती लागलेले नाही, दरम्यान आरोपींवर मोठ्या रकमेचे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असताना ते पोलिसांचे हाती लागत नसल्याने तपास यत्रणा गतिमान करण्याची गरज आहे.